News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 चं वेळापत्रक जाहीर

इंग्लंडमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू 16 जून 2019 रोजी भिडणार आहेत.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू 16 जून 2019 रोजी भिडणार आहेत. 14 जुलैला विश्वचषकाची अंतिम फेरी रंगणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दोन वर्षांपूर्वी ओव्हल मैदानावर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ समोरासमोर आले होते. यावेळी पाकिस्तानने 180 धावांनी टीम इंडियाचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारत पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असेल. मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात रविवारी 16 जून 2019 रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक पुढच्या वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्याने 30 मे 2018 रोजी वर्ल्डकपचा शुभारंभ होईल. पाच जूनला द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला सामना रंगणार आहे. 14 जुलै रोजी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या आठ संघांनी आयसीसीच्या वनडे क्रमवारीनुसार 30 सप्टेंबर 2017 रोजीच विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित केलं होतं. तर वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या दोन संघांनी मार्च महिन्यात क्वॉलिफायर स्पर्धा पार करुन जागा मिळवली. भारताचे सामने : दिनांक - प्रतिस्पर्धी संघ बुधवार 5 जून - द. आफ्रिका रविवार 9 जून - ऑस्ट्रेलिया गुरुवार 13 जून - न्यूझीलंड रविवार 16 जून - पाकिस्तान शनिवार 22 जून - अफगाणिस्तान गुरुवार 27 जून - वेस्ट इंडिज रविवार 30 जून - इंग्लंड मंगळवार 2 जुलै - बांगलादेश शनिवार 6 जुलै - श्रीलंका मंगळवार 9 जुलै - उपान्त्य फेरी 1 बुधवार 10 जुलै - राखीव दिवस गुरुवार 11 जुलै - उपान्त्य फेरी 2 शुक्रवार 12 जुलै - राखीव दिवस रविवार 14 जुलै - अंतिम फेरी
Published at : 25 Apr 2018 09:28 PM (IST) Tags: ICC Cricket World Cup 2019 वेळापत्रक timetable पाकिस्तान इंग्लंड भारत England India PAKISTAN

आणखी महत्वाच्या बातम्या

SRH vs RR Qualifier 2 :  फायनलला कोण जाणार? SRH vs RR ची प्लेईंग 11 कशी असेल ?

SRH vs RR Qualifier 2 : फायनलला कोण जाणार? SRH vs RR ची प्लेईंग 11 कशी असेल ?

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

रमेश तेंडुलकरांच्या लिखाणाचे रेकॉर्ड, सचिनच्या जागतिक विक्रमांना मोडित काढेल : शरद पवार

रमेश तेंडुलकरांच्या लिखाणाचे रेकॉर्ड, सचिनच्या जागतिक विक्रमांना मोडित काढेल : शरद पवार

Sachin Tendulkar : बाबा CID मध्ये होते, आम्ही दादरला 2 खोल्यांच्या घरात राहायचो, वडिलांच्या आठवणीत मास्टर ब्लास्टर भावुक

Sachin Tendulkar : बाबा CID मध्ये होते, आम्ही दादरला 2 खोल्यांच्या घरात राहायचो, वडिलांच्या आठवणीत मास्टर ब्लास्टर भावुक

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

टॉप न्यूज़

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 

तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा